रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 21 धरणे ओव्हरफ्लो

0

रायगड : राज्यात जून महिन्यात आगमन झालेल्या पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात धरण भागातही चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 28 पैकी 21 धरणे भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. रायगड जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाने बांधलेली 28 धरणे आहेत. खालापूर तालुक्यातील डोणवत आणि पनवेल तालुक्यातील मोरबे ही दोन धरणे सोडली तर इतर धरणे लहान आहेत. जिल्ह्यातील 28 धरणात 68 दलघमी पाण्याची साठवणूक क्षमता आहे. जिल्ह्यात आतापर्यत 2730 मिमी पाऊस पडला असून 87 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. धरण क्षेत्रातही उत्तम पाऊस पडल्याने 28 पैकी 21 धरणे ही ओसंडून वाहू लागली आहेत. सद्यस्थितीत 63.534 दलघमी म्हणजे एकूण 93 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), आंबेघर (पेण), श्रीगाव (अलिबाग), कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे (सुधागड), कडकी (श्रीवर्धन), पाभरे, संदेरी (म्हसळा), वरंध, खिंडवाडी, कोथूर्डे (महाड), भिलवले, कलोते, मोकाशी, डोणवत (खालापूर), मोरबे, बामणोली (पनवेल) ही 21 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर श्रीवर्धनमधील कार्ले 74 टक्के, रानवली 96 टक्के, महाड मधील खैरे 97 टक्के, कर्जतमधील साळोखे 26 टक्के, अवसरे 35 टक्के तर उरणमधील पुनाडे धरण 74 टक्के भरले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:28 PM 21-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here