“अक्षरदेवता श्रीगणेशाच्या उपासनेची दिशा ज्ञान – विज्ञानाच्या मार्गाने”

0

श्रीगणेश – हे केवळ महाराष्ट्राचे लाडके दैवत नसून साऱ्या आशियात त्याची अत्यंत श्रद्धेने पुजा होते.
सर्व कलांचे ,विद्यांचे ,कलांचेअधिष्ठान म्हणून गणेशाचे महत्व आहे .सर्व गणांचा ,अक्षरांचा अधिपती श्रीगणेश होय .श्रीगणेश रंगभूमीचा कर्ता आहे. तो नटेश्वरही आहे. तो गणांचा अधिपती सेनापती आहे. तो बुद्धीमान आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा आहे. तो निसर्गावर प्रेम करणारा व रक्षण करणारा आहे. तो विघ्नहर्ता, दुःखहर्ता आणि सुखकर्ता आहे.
” ॐकांर प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे ब्रह्मस्थान
अकार तो ब्रह्म ,उकार तो विष्णू
मकार महेशू जाणियेला “
अस जेव्हा संत तुकाराम म्हणतात तेव्हा
“उदर सामावली जया ब्रम्हांङ बीजे ,याची प्रचिती येते

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

श्रीगणेशाला आद्य लिपीदार मानले जाते. देवतांनी विनंती केल्यावर श्रीगणेशांनी वेद व्यासांनी रचलेले महाभारत लिपिबद्ध केले. गणपती अथर्वशिर्ष भारतीय लेखन परंपरेचं स्त्रोत आहे. भारतामधील सर्व भाषा व लिपी व व्याकरणाचे मूळ आधार अथर्वशिर्ष आहे.

ज्ञानातून मोक्ष प्राप्त होतो या संकल्पेतून गणेशाची व्युतप्ती मान्य केली की, श्रीगणेश “अक्षरदेवता” आहे हे आपल्या लक्षात येते.
“त्वं ज्ञानमयो विशानमयोSसि”
1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगची साथ आली . पुण्यात रोज शेकडो माणसे मरू लागली . रँड तपासण्याच्या नावाखाली लोकांचा छळ करू लागला. सरतेशेवटी चाफेकर बंधूनी रँडचा खून केला . टिळकानी पूण्यात प्लेगचे रुग्णालय उभ केले. इंग्रजांचा असंतोष पाहून अग्रलेख लिहीला ” सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?
2020 हे वर्ष टिळक स्मृति शताब्दी वर्ष आहे .
लो टिळकांनी 1893 मध्ये सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्रध्देने भारलेल्या वातावरणात आणि
श्रीगजाननाचाआशिर्वादाने सर्व भक्ताना करोनावर मात करणेस बुध्दीच शहाणपण आणि कृतीच बळ मिळेल

अँँड. विलास पाटणे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 21-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here