रत्नागिरीत ऐन गणेशोत्सवात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता

0

रत्नागिरी : केंद्र सरकारने राज्यांची सहमती न घेताच नियमनमुक्तीचा अध्यादेश काढून बाजार समित्या आणि शेतकऱ्यांवर केलेल्या नुकसानीविरोधात शुक्रवारी (ता.२१) पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपाला रत्नागिरी शंभर टक्के प्रतिसाद लाभला. बाजार समिती बंद असल्यामुळे सकाळच्या सत्रात होणारी भाजी लिलाव प्रक्रियाच थांबली. ऐन सणासुदीत भाजी न आल्यामुळे उपलब्ध व्यावसायिकांकडील भाजीचे दर वधारण्याची शक्यता आहे. रत्नागिरी बाजार समितीमधील ३१ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कोल्हापूर बेळगाव येथून येणाऱ्या भाजांची स्थानिकांकडून विक्री होते. संपामुळे हि प्रक्रिया थांबल्याने काल लिलाव झाला नाही. शिवाय गणपतीच्या सुट्टीमुळे सलग दोन दिवस लिलाव बंद राहणार आहे. ऐन सणासुदीला भाजी उपलब्ध होणे अशक्य असल्याने सध्या शिल्लक असलेल्या भाजीचे दर चढण्याची शक्यता आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
08:04 AM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here