चिपळूणमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्सव यंदा दीड दिवस

0

चिपळूण : येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव दीड दिवसाचा साजरा केला जाणार आहे. गणेशमूर्ती दीड फुटाची व शाडूच्या मातीची आहे. गुरुवारी (ता. २०) गणेशमूर्तीचे मोटारीने साध्या पद्धतीने कापसाळ येथील लवेकर बंधूंच्या गणपती कारखान्यातून आणण्यात आला. माधव सभागृहात हा गणेशोत्सव आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटणकर, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव नित्यानंद भागवत, उपाध्यक्ष रमेश चिपळूणकर व सुनील कुलकर्णी, सदस्य साहिल चौघुले, अमेय डांगे, पंकज शेट्ये हे मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. शनिवारी (ता. २२) दुपारी १२ वाजता प्रतिष्ठापना व रात्री ८ वाजता आरती, २३ ला सकाळी ८ वाजता पूजा-आरती व दुपारी ३ वाजता उत्तरपूजा, सायंकाळी ६ वाजता माधव सभागृह येथेच छोट्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धा कार्यक्रम होणार नाहीत. गणेशोत्सवाच्या ठिकाणी सॅनिटाइजर व सुरक्षित अंतर पाळून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
08:11 AM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here