‘निव्याचा राजा’चा उत्सवही साधेपणाने

0

साडवली : दरवर्षी थाटात वाजतगाजत येणारा निव्याचा राजा यंदा कोरोनामुळे साधेपणाने मिरवणुकीशिवाय येणार आहे. निवे येथील ४५ युवक एकत्र येवून गेली १४ वर्षे निव्याचा राजा सार्वजनिक गणोशोत्सव साजरा करत आहेत. यावर्षी साधेपणाने उत्सव होणार आहे. कोरोनामुळे शासनाचे सर्व नियम पाळून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच २५ ऑगस्टला रक्तदान शिबिर होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष वैभव गवाणकर, प्रसाद व्हालकर, प्रशांत शिंदे व सहकारी यासाठी योगदान देत आहेत. रत्नागिरीतील मूर्तीकार गायकवाड यांनी निव्याचा राजाची मूर्ती तयार केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
08:13 AM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here