राजापुरातील उत्सवात मर्यादित कार्यक्रम

0

राजापूर : शहरातील समर्थनगर येथील मारूती मंदिर धर्मशाळेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ९५ वा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे मिरवणूक वा कार्यक्रम न करता साधेपणाने उत्सव साजरा केला जाईल. शनिवारी (ता.२२) सकाळी १० वाजता श्रींची प्रतिष्ठापना होणार असून २६ ला दुपारी २ वा. श्री सत्यनारायण महापूजा, २८ ला सकाळी ९ वा. ललिता भावे संयोजित महिलांचे अथर्वशीर्ष, २९ ला सकाळी ८ वा. संसारे बंधू संयोजित पुरुषांची सहस्रावर्तने होणार आहेत. ३० ला दुपारी ३ वा.नंतर श्रींचे विसर्जन होईल. सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्सव मूर्ती देणाऱ्या दात्यांसाठी दरवर्षी चिठ्ठी सोडत ठेवली जाते. त्याप्रमाणे यावर्षीची उत्सव मूर्तीदात्याचा मान भारती उत्तम प्रभूदेसाई यांना मिळाला आहे. पुढील वर्षीच्या मूर्ती दात्यासाठी योजनेसाठी चिठ्यांची पेटी मारूती मंदिर कार्यशाळा येथे ठेवण्यात येईल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
08:15 AM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here