मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, सामाजिक भान ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन

0

मुंबई : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ‘सण आणि उत्सवांची बदलेली रुपं आपण पाहिली आहेत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
08:25 AM 22/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here