पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

0

राजापूर : तालुक्यातील हरळ येथील बबन आत्माराम साळवी (वय ६८) यांचा वहाळाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. गुरुवारी एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत बबन साळवी यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत रायपाटण पोलिस दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार बबन साळवी हे बुधवारी गुरे चरविण्यासाठी रानात गेले होते. त्यावेळी ते तेथील वहाळातून जात असता मुसळधार पावसामुळे वहाळाला अचानक पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्याबरोबर बबन साळवी हे वाहून गेले होते. दरम्यान, त्यांची गुरे सायंकाळी घरी परतली होती. मात्र, बबन साळवी घरी न आल्याने त्यांच्या घरातील मंडळींनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, गुरुवारी त्या वहाळातील एका झाडाला बबन साळवी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबतची खबर अनंत बबन साळवी यांनी रायपाटण पोलिस दूरक्षेत्रला दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:29 AM 22-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here