‘जेईई’ व ‘नीट’ परीक्षा वेळापत्रकात बदल नाही : एनटीए

0

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा ‘नीट’ आणि अभियांत्रिकीसाठीची राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा ‘जेईई’ आपल्या निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहेत. जेईई-मेन 1 ते 6 सप्टेंबर आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे. एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी संदर्भात विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. कोरोनासारखा साथरोग पुढील काळातही सुरू राहील. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालता येणार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. त्यानंतर शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, एनटीएने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असे स्पष्ट केलेय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:27 PM 22-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here