जिल्ह्यात कोरोनाचे 60 नवे रुग्ण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे 60 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3 हजार 405 इतकी झाली आहे. नव्याने आलेल्या अहवालांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे अहवाल रत्नागिरीतील आहेत. तर ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरीतील 11, कळंबणी 14, चिपळूण 7, दापोली 18 अशी एकूण 11 अधिक 50 अशा 61 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.(01 रुग्णांचा अहवाल दोन्ही तपासणी मध्ये पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60 आहे.) जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण बाधित रुग्ण 3405 असून बरे झालेले रुग्ण 2118 आहेत तर उपचारात असणारे ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 1287 आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here