उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व अन्य नेत्यांवर ठराविक कालावधीत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतच सांगितले. बाहेरून येणार्या नेत्यांना मुक्त प्रवेश आणि पक्षाच्या नेत्यांना फिल्टर असेच पक्षाचे धोरण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण महाजनादेश यात्रा सुरू केल्यानंतर इतर अनेकांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यांना शुभेच्छा, असा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावून मुख्यमंत्री म्हणाले.
