चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी एसटीला पसंती

0

रत्नागिरी : मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांनी एसटीला पहिली पसंती दिल्याचे चित्र आहे. गणपतीचा सणानंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीने सोडलेल्या जादा फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीतून ग्रुप बुकींगच्या 113 तर वैयक्तिक 148 अशा एकूण 261 गाडय़ांचे आरक्षण फुल झाले आहे, तर 294 गाडय़ांचे आरक्षण अंशतः फुल झाले आहे. एसटीने यंदा 5 ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी जादा गाडय़ा सोडल्या होत्या. या गाडय़ांना 12 ऑगस्टपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 13 ऑगस्टपासून कोरोना चाचणीचा नियम टाकल्याने एसटीच्या गाडय़ांना प्रतिसाद कमी झाला. आता परतीच्या प्रवासासाठी 23 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मुंबईकर चाकरमान्यांनी पुन्हा आपल्या एसटीला प्रतिसाद दिला आहे. 28, 29 व 30 ऑगस्ट शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा विकेण्डला परतीच्या प्रवासासाठी सर्वाधिक एसटी बसेसचे आरक्षण झाले आहे. 28 ऑगस्टला 15 ग्रुप आरक्षण तर 27 वैयक्तिक आरक्षणाच्या अशा 42 बस फुल्ल तर 150 बसेसचे अंशतः आरक्षण अशा 192 तर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी 68 ग्रुप बुकींग तर 68 वैयक्तिक आरक्षण अशा 136 बसेस फुल्ल तर 140 बसेस अंशतः फुल्ल अशा 276 बसेस सुटणार आहेत. तर रविवार 30 ऑगस्ट रोजी 77 ग्रुप तर 77 वैयक्तिक आरक्षण अशा 154 बसेस फुल्ल झाल्या असून 131 अंशतः भरलेल्या अशा 285 बसेस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून सुटणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here