कामथे रूग्णालयाला ५ हजार मास्कची मदत

0

चिपळूण : चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व व्यावसायिक व कामथेचे सरपंच विजय माटे यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयाला चांगल्या दर्जाचे ५ हजार मास्क दिले आहेत. रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय सानप यांच्याकडे ते मास्क गुरूवारी सुपूर्द केले. कामथे रुग्णालयात ग्रामीण भागातून अनेक रुग्ण तपासणीसाठी तसेच उपचारासाठी येत असतात. त्यांच्याकडे मास्क नसल्याने गैरसोय होते. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन श्री. यादव व श्री.माटे यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयाला मास्क पुरविले आहेत. कोरोना संकटात रूग्णालय प्रशासनाला मास्कच्या माध्यमातून सहकार्य केल्याबद्दल डॉ.सानप यांनी प्रशांत यादव व विजय माटे यांचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:36 PM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here