उरण तालुक्यात ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात तेलगळती

0

रायगड : उरण तालुक्यात ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली आहे. पाईपलाईन लिकेज झाल्याने ही गळती झाली आहे. दरम्यान ही गळती थांबविण्यासाठी ओएनजीसी प्रकल्प प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. अडीचशे किलोमीटर दूरवर असणाऱ्या बॉंबे हायवे येथून अरबी समुद्रामधून उरण प्रकल्पाकडे टाकण्यात आलेल्या टरबाईन लाईनमधून हे लिकेज झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ओएनजीसी प्रकल्पातील तज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून तेल गळती थांबविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान गेल्यावर्षी 3 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव काळातच ओएनजीसी प्रकल्पामधील न्यु एलपीजी 3 या ठिकाणी मोठी आग लागली होती. या आगीमध्ये पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला होता. तर यामध्ये एका उच्च अधिकाऱ्याचाही जिव गेला होता. यामुळे वर्षभरातच पुन्हा झालेल्या तेल गळतीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:49 PM 24-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here