काळया फिती बांधून मैदानात उतरला भारतीय संघ

0

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात जेटली यांच्या निधनाबद्दल आपली शोकभावना प्रगट करण्यासाठी दंडावर काळया फिती बांधून उतरला आहे. भारत-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावात संपुष्टात आला असून भारताला ७५ धावांची आघाडी मिळाली आहे.

राजकारणाबरोबर अरुण जेटली हे क्रिकेटशीही संबंधित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. दिल्ली क्रिकेट संघटनेचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here