कणकवली एसटी आवारात भव्य व्यापारी केंद्र उभारणार : ॲड. अनिल परब

0

सिंधुदुर्ग : परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी सोमवारी कणकवली एसटी आगराला भेट देवून आगाराची पाहणी केली. सध्या कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे एसटीची परिस्थिती बिकट होवून पडली आहे. या परिस्थितीत एसटीचे पुनर्जीवन करणे आवश्यक आहे. कणकवली येथील एसटीच्या ७ एकर जागेमध्ये बसस्थानक, बस आगार व एसटी विभागीय कार्यालयाबरोबरच येथे भव्य व्यापारी उद्योंग केंद्र उभारण्यात येणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. परब पुढे म्हणाले की, भविष्यात कणकवली शहर हे उद्योग व व्यापारी दृष्टीकोनातून मोठे होवून एसटी महामंडळालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कणकवली शहरातील बाजारपेठही आजूबाजुच्या सर्व खेड्यापाड्यातील गावांचा केंद्र बिंदू असल्याने त्याचा व्यापारी दृष्टीकोनातून जिल्ह्याला फायदा होईल.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here