बिबट्याची नखे, पंजे काढून पुरले खड्डयात

0

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक पवारवाडी येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याचे पंजे व नखे गायब करून त्याला खड्डयात पुरून पुरावा नष्ट करण्याचा गंभीर प्रकार सोमवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सरपंच व विद्यमान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह चौघांना वनाधिकारी व पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वेरवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या घराशेजारी गेले काही दिवसांपासून प्रचंड वास येत होता. एका अज्ञात प्राण्याची शेपटी पुरलेल्या खड्ड्याबाहेर दिसून येत होती. याबाबत गावात चर्चा सुरू होती. “आम्ही तीन दिवसांपूर्वी बिबट्याला पुरले”, असे एका इसमाने बेकायदेशीर दारू अडड्यावर सांगन घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. हाच धागा पकडून एका नागरिकाने बिबट्याचा मृत्यू झाल्याची तक्रार वनाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर वनाधिकारी आणि पोलिस यांनी या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी पाठपुरावा केला.त्यानुसार सोमवारी सायंकाळी वनविभागाची टीम वेरवलीत दाखल झाली. आलेल्या तक्रारीनुसार आणि वर्णनानुसार जागेचा शोध घेतला. बिबट्या पुरलेला खड्डा उकरून त्यातील बिबट्याचे शव बाहेर काढले. बिबट्या कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र त्याचे चारही पंजे गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकरणाने खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. हा बिबट्या फासकीत अडकलेला होता. मात्र फासकीत तो जिवंत होता की त्याचा मृत्यू झाला होता हे आता तपासात उघड होणार आहे. या फासकीतील बिबट्याची हत्या करण्यात आली का? याबाबतही चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. या घटनेची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:32 AM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here