बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूची सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक

0

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज(24 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2019मध्ये महिला एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात चीनच्या चेन यू फेईचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पराक्रम केला आहे.

सिंधूने 40 मिनीटे चाललेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात चेन यू फेईचा 21-7,21-14 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

सिंधूने याआधी या स्पर्धेत 2017 आणि 2018 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण तिला दोन्हीवेळेस अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच 2013 आणि 2014 मध्ये तिला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here