‘या’ राज्यात आता प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही; १४ दिवस क्वारंटाईन सुद्धा नाही

0

बंगळुरु : कर्नाटकात लॉकडाऊनच्या पाच महिन्यानंतर प्रवासी वाहतूक संबंधी सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये ई-पास किंवा 14 दिवस क्वारंटाईनची देखील आवश्यक नाही. निर्बंध हटविल्यानंतर राज्य गृह मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जात आहे. सुधारित प्रोटोकॉलनुसार, कर्नाटकात येणाऱ्या लोकांना प्रवेशासाठी सेवा सिंधू पोर्टलवर पास घेण्याची गरज भासणार नाही. तसेच कर्नाटकात सीमा, बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर वैद्यकीय तपासणीवर सुद्धा बंदी घातली आहे. आता कोणत्याही निर्बंधाशिवाय रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाने कर्नाटकला जाता येते. जर कर्नाटकला आल्यानंतर एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तर तो १४ दिवस होम क्वारंटाईन न राहता कामावर जाऊ शकतो किंवा बाहेर फिरू शकतो. मात्र, त्या व्यक्तीला १४ दिवस स्वत:ला निरीक्षण करावे लागेल. जर लक्षणे दिसली तर त्या व्यक्तीला सेल्फ आयसोलेट होऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, कर्नाटकातील लोकांना मूलभूत कोविड -१९ चे नियम पाळावे लागतील. म्हणजेच मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, साबण- पाणी किंवा सॅनिटायझरने हात धुणे यासारखे नियम पाळावे लागतील. आतापर्यंत कर्नाटकात १४ दिवस क्वारंटाईन आवश्यक होते आणि प्रवाशांवर नजर ठेवण्याचा नियम होता. सेवा सिंधू अधिकाऱ्यांच्या मते कर्नाटकात येण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत या पोर्टलमध्ये ११ लाख लोकांनी नोंदणी केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:28 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here