ऐन गणेशोत्सवात संगमेश्वर परिसरात विजेचा लपंडाव

0

संगमेश्वर : तुरळ, कडवई, शिंदे आंबेरी या परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. या प्रकाराला येथील ग्राहक वैतागले आहेत. गणपती घरी असताना सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. शनिवारी सकाळच्या दरम्यान अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला, गणेश पूजन सुरू असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. गणेशोत्सव असताना विजेचा लंपडाव सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here