भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ऐतिहासिक विजयासह जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारावर 21-07, 21-07 अशी एकतर्फी मात केली. जागतिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णभरारी घेणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी ओकुहारावर 37 मिनिटांच्या खेळातच मात केली. तिने 21-07, 21-07 असा एकतर्फी विजय साकारला. तसेच तिने या विजयासह 2017 मध्ये ओकुहाराकडून याच स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्यापराभवाचाही बदलाघेतला.
सिंधूचे जागतिक बॅडमिंटनमधील हे पहिलेच सुवर्णपदक असून एकूण पाचवे पदक आहे.
