जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी ही नावे जाहीर केली. हे पुरस्कारविजेते असे – किशोर लीलाधर देवकर (ता. मंडणगड, शाळा पालघर), गणेश तुकाराम तांबिटकर (ता. दापोली, विसापूर शाळा), सुनील अर्जुन तांबे (ता. खेड, घाणेखुंट नं. 2), श्रीमती वृषाली विजय सुर्वे (ता. चिपळूण, कात्रोळी देऊळ शाळा), प्रभाकर भिकाजी कांबळे (ता. गुहागर, मढाळ नं. ३), सुधीर जयराम सावंत (ता. संगमेश्वर, बोंडये), संजीवनी संदीप भावे (ता. कोतवडे, धामेळे), जनार्दन कमलाकर मोहिते (ता. लांजा, बेनी बुद्रुक नं. १), मदन गुणाजी डोर्लेकर (ता. राजापूर, वाडीखुर्द). विशेष पुरस्कार ः विलास शंकर कानर (ता. संगमेश्वर, मोर्डे नं. १). यंदा प्रत्येक तालुक्यातील पुरस्कारासाठी सुमारे दोन ते तीन असे २४ प्रस्ताव आले होते. करोना कालावधीतही नियमांचे पालन करत त्या शिक्षकांच्या मुलाखती अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण सभापती सुनील मोरे, शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या होत्या. त्यातून आदर्श पुरस्कारांसाठी पात्र शिक्षकांची नावे निवडण्यात आली आहेत. शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. गेली २ वर्षे ही परंपरा राखण्यात जिल्हा परिषद प्रशासन यशस्वी ठरले आहे. मात्र यावेळी करोनाविषयक टाळेबंदीमुळे पुरस्कार जाहीर झाले, तरी पुरस्कार वितरण कार्यक्रम अजूनही अनिश्चित आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 25-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here