विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी राहिला असल्याने राज्यात पक्षांतर करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये कोणाला आधी गळ लावतो यावरून जणू शीतयुद्धच रंगले आहे.
आता या यादीमध्ये कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि गुहागर येथील आमदार भास्कर जाधव शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यांनी आज (ता.२५) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली.
राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आतापर्यत पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे आता आमदार भास्कर जाधवही धक्का देणार का?
