धार्मिकस्थळे खुली करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन

0

मुंबई : राज्यातील धार्मिकस्थळे खुली व्हावीत म्हणून आध्यात्मिक समन्वय आघाडी आक्रमक झाली आहे. या आध्यात्मिक आघाडीने येत्या शनिवारी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी आरोळी देत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं या आघाडीने सांगितलं. राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करावीत या मागणीसाठी राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्यांच्या प्रमुखांची एक बैठक पार पडली. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:26 AM 26-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here