चित्रपटगृहे सुरु करण्याबाबत खासदार सुप्रीया सुळे यांचा पुढाकार

0

मुंबई : राज्यात कोरोनामुळे चित्रपटगृहेही बंद असल्याने चित्रपटगृहाचे मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक तोडगा काढा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून केली आहे. राज्यातील व्यायामशाळा सुरु करण्याची विनंती यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती आता राज्यातील एकल पडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहे सुरु करण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी सुप्रीया सुळे यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी चित्रपटगृह चालक खास करून सिंगल स्क्रीन चित्रपटगृह चालकांसमोरील आर्थिक अडचणींची माहिती दिली आहे. चित्रपटगृह बंद असल्याने त्यांच्यावर मालमत्ता कर आकारण्यात येऊ नये, चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्यासाठी किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा मागण्याही या निवेदनात केल्या आहे या निवेदनाच्या आधारे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर एक पडदा चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे या चित्रपटगृहांचे मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. कृपया एक पडदा चित्रपटगृहांच्या मालकांच्या मागण्यांवर सहानभूतीपूर्वक विचार करून त्यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी विनंती सुप्रीया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 26-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here