दापोली : कोरोना महामारीच्या काळातही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असून, दापोली तालुक्यात सुमारे ५ हजार ३०० घरगुती बापा विराजमान झाले आहेत, तर २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शहरातील गणेश विसर्जनाकरिता दापोली नगर पंचायत सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवाचे काही नियम सरकारने घालून दिले आहेत. या नियमांचे पालन करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने योग्य नियोजन केले असून, शहरात दीड दिवसाचे व पाच दिवसाचे मिळून अडीच हजार गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी दापोली नगर पंचायतीचे कृत्रिम गणेश घाट सज्ज केले आहेत. शहरात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले असून पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी दापोली नगर पंचायत सज्ज झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 26-Aug-20
