मनसे कार्यकर्ते रवी काणेकर यांच्यातर्फे रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

चिपळूण : चिपळुणातील मनसे कार्यकर्ते रवी काणेकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २५ रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून या व्यावसाविकांना दिलासा दिला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरूवातीच्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. नंतर अनलॉक जाहीर करण्यात आले, तरीही रिक्षा व्यावसायिकांना आपला व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. पर्यायाने रिक्षा व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी गेल्या काही महिन्यांपासूनची कसर भरून काढण्यास कालावधी लागणार आहे.ही बाब लक्षात घेऊन चिपळुणातील मनसे कार्यकर्ते रवी काणेकर यांनी रिक्षा व्यावसायिकांना थोडाफार दिलासा देण्याच्यादृष्टीने गणेशोत्सवाच्या तोंडावर शिक्षणातील २५ रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यानुसार गुरुवारी या किटचे स्वागत रिक्षा स्टॅड येथे वाटप केले. यावेळी स्वागत रिक्षा स्टँडचे अध्यक्ष रवींद्र साळवी, संतोष रहाटे, रवींद्र घाडगे, सत्तार कडवेकर, वैभव कुंभार, अशोक कुंभार आदी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:55 PM 26-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here