जिल्ह्यातील उद्योगांबाबत आज बैठक

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांबाबत गुरुवार (दि. २७ ऑगस्ट) उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषण न करणारे उद्योग सुरू व्हावेत, असे शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने कोणते उद्योग उभारता येतील, अधिकाधिक तरुणांना रोजगार कसा देता येईल, सध्या अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी काय करता येईल, याचा विचार करण्यासाठी ही बैठक होणार आहे. रत्नागिरी हा फलोद्यान जिल्हा तर सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे त्यानुसार उद्योगांची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय होणार आहे. प्रदूषणविरहित कारखान्यांसाठी राज्यात रत्नागिरी जिल्हा अग्रेसर असेल, हजारो तरुणांना रोजगार मिळेल, अशी यंत्रणा तयार केली जाईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:03 AM 27-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here