नगराध्यक्षाचा निर्णय; चिपळूणात उभी रहाणार मिनी एमआयडीसी

0

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे असलेल्या चिपळूण न.प. मालकीच्या आरक्षित जागेवर औद्योगिक वसाहत उभी करण्याच्या दृष्टीने न.प.ने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक नियोजन म्हणून या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या हस्ते नुकताच झाला. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बहादूरशेख चौकानजिक न.प.ने 25 वर्षांपूर्वी सुमारे 110 गुंठे जागा आरक्षित केली. या जागेवर बहुउद्देशीय लघु औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय त्यावेळी झाला. मात्र, 25 वर्षांत केवळ आरक्षित जागा एवढीच ओळख या जागेची होती. या कालावधीत मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचे साम्राज्य उभे राहिले. या झोपडट्टीतून अनधिकृत व्यवसाय देखील सुरू झाले. मध्यंतरात झोपडपट्टी व अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात आली. दोनवेळा ही कारवाई झाली. मात्र, त्यानंतर आरक्षित जागेबाबत योग्य निर्णय होऊ शकला नाही. परिणामी, पुन्हा या जागेवर झोपडपट्टी व अतिक्रमणे उभी राहिली. दरम्यान, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी नियोजित आरक्षणानुसार या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे प्रथम संपूर्ण जागेला संरक्षक भिंत उभारण्याचे काम प्राथमिक स्तरावर हाती घेण्यात येणार आहे. या संरक्षक भिंत उभारणी कामाचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्षा सौ. खेराडे यांच्या हस्ते व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झाला. संरक्षक भिंत उभारण्याबरोबरच लवकरच आरक्षित जागेवरील अतिक्रमणे व झोपडपट्टी हटविली जाणार आहे. त्यानंतर बहुउद्देशीय लघु औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन तसेच रेखांकन केले जाईल. त्यानंतर औद्योगिक वसाहत उभी करण्याचे प्रत्यक्ष काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक बेरोजगार तरूणांना या वसाहतीत छोटे-छोटे उद्योग करण्यासाठी नगर परिषद व्यावसायिक जागा उपलब्ध करुन देणार आहे व औद्योगिक वसाहतीला आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा देखील न.प.च्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत.

HTML tutorial


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here