जमिनीच्या वादातून हाणामारी; १२ जणांवर गुन्हा दाखल

0

आरवली : जमिनीच्या वादातून मंगळवारी करजुवे येथे हाणामारी झाल्याने पोलिसांनी संशयित १२ जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. रेश्मा रवींद्र गुरव (वय ४७) रा. करजुवे, गुरववाडी यांनी माखजन पोलिस दूरक्षेत्रावर ही खबर दिली. तक्रारीनुसार, ”२५ ऑगस्ट रोजी ७.३० वा.च्या दरम्यान त्यांच्या जमिनीत रंजिता रघुनाथ गुरव ही जमीन खणत होती. म्हणून माझे पती रवींद्र शंकर गुरव यांनी “ही आमची जमीन आहे तू खणू नको”. तेव्हा ती म्हणाली “तू बायकांसारखा बोलू नकोस. तू माझ्या नवऱ्याजवळ बोल”. तेवढ्यात तेथे रंजिता गुरव हिचा नवरा रघुनाथ शांताराम गुरव हा तेथे आला. त्यानंतर मला व माझ्या पतीला शिवीगाळ करू लागला. त्यानंतर आम्ही घरी आल्यावर रघुनाथ शांताराम गुरव, चंद्रकांत सखाराम गुरव, अक्षय चंद्रकांत गुरव, महेंद्र संतोष पालांडे, मधुकर शांताराम गुरव, संतोष तुकाराम पालांडे, दीपक जगन्नाथ गुरव, प्रथमेश संतोष पालांडे, जितेंद्र सुरेश चव्हाण, रंजिता रघुनाथ गुरव, मिलन मधुकर गुरव, राजेश्री राजाराम गुरव सर्व रा. करजुवे गुरववाडी हे गैरकायदा जमाव करून आमच्या घराजवळ येऊन लाठ्याकाठ्या घेऊन दरवाजावर व खिडकीवर मारू लागले. त्यावेळी चंद्रकांत सखाराम गुरव व महेश संतोष पालांडे यांच्या काठ्या माझ्या उजव्या हाताला लागून किरकोळ दुखापत झाली आहे. ठार मारण्याची धमकीही दिली.” याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकांस्टेबल प्रशांत शिंदे, उशांत देशमवाड, संदेश मोंडे अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 27-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here