प्रविण तांबेने घडवला सीपीएलमध्ये घडवला इतिहास

0

मुंबई : कोण म्हणतंय टी 20 क्रिकेट हा फक्त युवकांसाठीचा खेळ आहे. मुंबईच्या फिरकीपटूने आपल्या पराक्रमाने हा मुद्दा खोडून काढला आहे. 48 वर्षीय तांबेने बुधवारी इतिहास घडवला. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. प्रवीण तांबेने ट्रिनबॅगो नाइट राइडर्स संघाकडून खेळताना सीपीएलमध्ये पदार्पण केले. तांबेने सेंट लुसिया जुक्स यांच्याविरुद्ध खेळत असताना सहाव्या चेंडूवर विकेट घेतली. अफगाणिस्तानचा फलंदाज नजीबुल्लाह जादरानला बाद करत सीपीएलमध्ये आपली पहिली विकेट घेतली. कर्णधार कायरन पोलार्ड याने प्रवीण तांबेला सामन्यातील अकराव्या षटकात गोलंदाजी करण्यास पाचारण केले. षटकातील पहिल्याच चेंडूवर जादरानने मिडविकेटवर छक्का मारून त्याचे स्वागत केले. पुन्हा पाचव्या चेंडूवर चौकार हे ठोकला. त्यानंतर अनुभवी तांबेने गोलंदाजीत बदल करत जादरानची विकेट घेतली. जादरानला गुगली चेंडू ओळखता आला नाही. जोरदार फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. पोलार्डने त्याचा झेल टिपला. प्रवीण तांबेवर आयपीएल 2020 मध्ये खेळायला बंदी घालण्यात आली आहे. 48 वर्षीय गोलंदाजाला केकेआरने 20 लाख रुपयांच्या किंमतीत विकत घेतले होते, परंतु शारजाहमध्ये टी 10 लीगमध्ये भाग घेतल्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला. खरं तर, प्रवीण तांबे यांनी 2018 मध्ये निवृत्ती घेतली होती, ज्याची माहिती त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली होती. यानंतर तो शारजाहमध्ये टी 10 लीग खेळला. निवृत्ती घेतली असतानाही या स्पर्धेपासून त्याने क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन केले. त्यानंतर त्याने मुंबई लीगमध्ये भाग घेतला. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही क्रिकेटपटू दुसर्‍या देशातील क्रिकेट मंडळाच्या लीगमध्ये तेव्हाच खेळू शकतो जेव्हा त्याने भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी. यापूर्वी मूळचा भारतीय असलेला 19 वर्षीय क्रिकेटपटू सनी सोहल 2018 मध्ये बार्बाडोस ट्रायडर्सकडून खेळला होता. परंतु त्यावेळी तो अमेरिकन नागरिक म्हणून निवडला गेला होता. तांबे कालचा सामना सुनील नरेनच्या जागी खेळला. वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करत लीगमध्ये खेळलेला तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने आयपीएलमधील 33 सामन्यात 30.5च्या सरासरीने 28 बळी घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here