शिवश्री हाॅस्पिटलला कोविड DCHC साठी प्रशासनाची मान्यता

0

रत्नागिरी : शहरातील ग्रामीण पोलिस स्टेशन शेजारी, कारवांचीवाडी रोड येथील शिवश्री हाॅस्पिटलला कोविड DCHC साठी प्रशासनाने मान्यता दिली आहे. मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी DCHC साठी शिवश्री हाॅस्पिटल ला मान्यता दिली आहे. त्यामुळे कोविड पाॅझिटीव्ह आल्यावर शिवश्री हाॅस्पिटलला अॅडमिट होवून उपचार घेवू शकणार आहोत. DCHC मुळे आॅक्सिजन ची मात्रा कमी झालेले रूग्ण सुध्दा उपचार घेवू शकणार आहेत. कोविडची सौम्य लक्षणे असणारे रूग्ण उपचार घेवू शकणार आहेत. यामध्ये जनरल वाॅर्ड, स्पेशल रूम्स, २४ तास डाॅक्टरांच्या निगराणीखाली, एमरजन्सी आॅक्सिजन ची सोय, फिवर क्लिनिक, एक्स-रे, रक्त तपासणीसाठी लॅब सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डाॅ. प्रतिक सुजित झिमण (9373871999) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:10 AM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here