सिंधुदुर्गात उभे राहणार पंचतारांकित हॉटेल

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात ताजचे फाईव्ह स्टार हॉटेल उभारलं जाणार आहे. मौजे शिरोडा वेळागर येथील जमीन हस्तांतरण करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता संपादीत केलेली व शासकीय जमीन मिळून एकूण ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्याकरीता भाडेकरार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोकणात प्रथमच पंचतारांकीत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्पात ताज ग्रुप 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या प्रकल्पामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात देशी व परदेशी पर्यटक आकर्षित होतील. तसेच यामुळे रोजगार निर्मिती व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळेल.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here