पत्नीने पतीवर केले धारदार सुरीने वार

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या सडामिऱ्या येथे किरकोळ कारणातून पत्नीने पतीवर धारदार सुरीने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.१५ वा. सुमारास घडली. या प्रकरणी संशयित पत्नीविरोधात शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नाली सुकांत सावंत (३२, रा.सडामिऱ्या, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्या विरोधात पती सुकांत गजानन सावंत (४३, रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, काही दिवसांपासून त्यांची पत्नी घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. याबाबत सुकांत सावंत यांनी पत्नीला कुठे गेली होतीस? असा जाब विचारला. याचा राग आल्याने पत्नीने धारदार सुरीने त्यांच्या उजव्या हातावर वार केले. यात पतीच्या हाताची बोटे दुखावली आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस उप निरीक्षक चव्हाण करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 28-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here