पूजेचा पहिला मान “साहेबाना”

0

श्री रत्नागिरीचा राजाचा उत्सव सुरू झाल्यापासून दरोरोज राजाची विधिवत पूजाअर्चा केली जाते. दरवर्षी राजाच्या पहिल्या पूजेचा मान हा ना. उदय सामंत यांना मिळतो. राजाची पहिली पूजा ना. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडल्यानंतर ११ दिवस राजाच्या दरबारात मोठा उत्सव साजरा होत असतो. जणू यात्रेच स्वरूप त्याठिकाणी पहायला दरवर्षी मिळत असते. याकाळात लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी रत्नागिरीतील अनेक भजनी मंडळे राजाच्या दरबारात येऊन सुमधुर भजनांनी राजाच्या चरणी आपली सेवा देखील अर्पण करीत असतात.

(कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंध आले. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीच्या राजाचा उत्सव यावर्षी न करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र रत्नागिरी खबरदार या गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या उत्सवाच्या आठवणी शब्द सुमनांच्या रूपाने जागवणार आहे.)

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:06 PM 28/Aug/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here