नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपामध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असेल, असे संकेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहेत. तसेच प्रसाद लाड यांनी ते रत्नागिरीतून लढण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले. त्यासाठी सध्या रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी चाचपणी सुरु आहे.
विधानसभेसाठी सेना-भाजप युती अभेद्य आहे. पण युती तुटली तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही काळामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
