विजेचा धक्का बसून नेपाळी कामगाराचा मृत्यू

0

देवगड : हिंदळे कोळंबी प्रकल्पाच्या ठिकाणी कामाला असलेल्या एका नेपाळी कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. रमेश पदम बंब (२८) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. हिंदळे-तावडेवाडी येथील कोळंबी प्रकल्पाच्या ठिकाणी रमेश हा कामाला होता. कुटुंबासमवेत तो हिंदळे येथे राहत होता. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास प्रकल्पाचा ठिकाणी असलेली वीज यंत्रणा चाल होत नसल्याने लाईन तपासणी करीत असताना अचानक विजेचा शॉक बसल्याने तो पाण्यात कोसळला. त्याला उपचारासाठी मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेची भास्कर विजय पाटील यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपास स.पो.उपनिरिक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here