कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण

0

नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचेही वितरण केले जाते. परंतु यंदा कोरोनामुळे पहिल्यांदाच या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रपती भवनात न होता ऑनलाईन होणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. विविध विभागांमध्ये एकूण ७४ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यापैकी ६४ जण सोहळ्याला उपस्थित राहतील. जे मानकरी वैयक्तिकरित्या सोहळ्यात उपस्थित राहू शकत नाहीत, ते एकतर कोरोना पॉझिटिव्ह आहेत किंवा विलगीकरणात आहेत. काही खेळाडू देशाबाहेर असल्याने ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. पुरस्कार प्राप्त खेळाडू आपापल्या शहराच्या स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सेंटरमधून हजर राहतील. याशिवाय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि काही प्रमुख पाहुणे विज्ञान भवनातून या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here