सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

0

नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने ऐतिहासिक विजयासह जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारावर 21-07, 21-07 अशी एकतर्फी मात केली. जागतिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णभरारी घेणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी ओकुहारावर 37 मिनिटांच्या खेळातच मात केली. तिने 21-07, 21-07 असा एकतर्फी विजय साकारला. तसेच तिने या विजयासह 2017 मध्ये ओकुहाराकडून याच स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचाही बदला घेतला. सिंधूचे जागतिक बॅडमिंटनमधील हे पहिलेच सुवर्णपदक असून एकूण पाचवे पदक आहे. ऑलम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सिंधूने यापूर्वी 2017 आणि 2018 मध्ये रौप्य तर 2013 आणि 2014 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here