चिपळूणातील ८४ ग्रामपंचायतींवर प्रशासक

0

चिपळूण : तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता शासनाने प्रशासक नेमले आहेत. चिपळूण तालुक्यात ८४ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता गावचा कारभार सरपंच न करता प्रशासक गाव गाडा चालवणार आहेत. यात सहाय्यक गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व विविध विभागातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींचा कारभार हे नियुक्त केलेले प्रशासक सांभाळणार आहेत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:48 PM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here