रत्नागिरीतील गुणवंत विद्यार्थ्यांना निलेश राणे यांनी दिले टॅब

0

रत्नागिरी : आजच्या विद्यार्थ्यांवर आपलं उद्याचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण प्रोत्साहन देण्याची शिकवण राणेसाहेबानी आम्हाला दिली आहे . त्यासाठी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपीठ तयार करून देण्याची जबाबदारी आपली असून राणे कुटुंबीय त्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत रत्नागिरी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी टॅब आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव केला आहे. यामध्ये फाटक हायस्कुलची 100 टक्के गुण मिळवणारी गिरीजा शैलेश आंबर्डेकर, जीजीपीएस हायस्कुलची 100 टक्के गन मिळवणारी दीक्षा महेश परशराम, रा. भा. शिर्के प्रशालेचा 99.80 टक्के गुण मिळवणारा यशराज सुहास राणे, मिस्त्री हायस्कुलची 91.40 टक्के गुण मिळवणारी सबा हिदायत भाटकर, कॉन्व्हेंट हायस्कुल, उद्यमनगरचा 99.20 टक्के गुण मिळवणारा ऋजुल अजित पवार, एम.एस. नाईक हायस्कुलची 95.20 टक्के गुण मिळवणारी अक्सा आरिफ काझी आणि यशवंतराव माने विद्यालयाची 93.40 टक्के गुण मिळवणारी जान्हवी विनायक गावडे यांना गौरविण्यात आले. रत्नागिरी शहरातील प्रमुख शाळांमधील प्रथम आलेल्या या विद्यार्थ्यांना, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा सचिव राजू भाटलेकर, जिल्हा सचिव प्रशांत डिंगणकर, ज्येष्ठ नेते नित्यानंद दळवी, महिला मोर्चा अध्यक्ष ऐश्वर्या जठार, रत्नागिरी तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष पिंट्या निवळकर, भाई जठार, संकेत चवंडे, शोएब खान, शिवाजी कारेकर, सुरेश गोरे, सुरेश निवळकर, अभिलाष कारेकर यांच्या हस्ते टॅब आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठ्या शहरात जन्माला यावं, ही गरज नाही. आज मुलांना आम्ही टॅब उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा उपयोग करून, शिक्षणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन माहिती विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून घ्यावी. जग कोणत्या दिशेने चालले आहे, त्याचा अभ्यास करा, जगाशी कनेक्ट व्हायला या टॅबचा वापर करा, असा कानमंत्र निलेश राणे यांनी मुलांना आपल्या कार्यकर्त्यांमार्फत दिला आहे. भाजपा नेते आणि सर्व कार्यकर्त्यांनी या यशस्वी मुलांचे अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here