चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खेड आगाराकडून विशेष गाड्या

0

खेड : गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी खेड एसटी आगाराने मुंबई, ठाणे, बोरीवली या मार्गावर विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. चाकरमान्यांच्या सोयीसाठी ग्रुप बुंकीगची सुविधाही आगाराकडून देण्यात आली असून ग्रुप बुकिंगला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रमुख प्रशांत करवंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी खेड एसटी आगाराने मुंबई, बोरीबली, ठाणे या मार्गावर 91 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. 27 ते 29 या दरम्यान गावी आलेल्या अनेक चाकरमान्यांना घेऊन या एसटी बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. खेड आगाराने यंदा प्रवाशांसाठी ग्रुप बुकिंगचीही सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सुविधेचाही चाकरमान्यांनी लाभ घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी शासनाने सुचित केलेल्या सर्व खबरदाऱ्या घेऊन प्रवाश्याना एसटी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचे आगारप्रमुख करवंदे यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 29-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here