दिलखुलास, संस्थात्मक दृष्टिचे माजी नगराध्यक्ष बाबासो पाटणे यांचे दुःखद निधन

0

रत्नागिरी : बाबासो पाटणे यांच्या जाण्याने सामाजिक भान असलेल दिलखुलास व्यक्तिमत्व हरपले. बाबानी खेडच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात जबाबदारीने काम केलं. बाबांचे वडिल वि. तु. पाटणे कॉग्रेसचे मोठे नेते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बाबानी बेरजेचे राजकारण केले. आपला मुद्रण व्यवसाय सांभाळून त्यानी समाजात नेटाने आणि जाणिवेने काम केलं. नगराध्यक्ष म्हणून त्यानी खेड शहराचे प्रश्र मार्गी लावले. एल पी इंग्रजी स्कूल मध्ये आत्मीयतेने काम केलं. पाथरजाई देवीच्या मंदिराच्या जिणौद्धारामध्ये श्रद्धेने नेतृत्व केलं. बाबा हॉलीबॉल उत्कृष्ट खेळत. बाबांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्याचा राबता असे. हसर व्यक्तिमत्व, लाघवी स्वभाव, कष्ट घेण्याची तयारी, उत्कृष्ठ संवादशैली यामुळे बाबा अजातशत्रू होते.
‘शिमग्यात पाथरजाई देवीच्या दर्शनाला बावाना फोन करून दर्शनाला गेलो. दर्शन झालं, बाबांची भेट झाली आता खेडला गेल्यावर बाबांची भेट होणार नाही, याच मित्र म्हणून मोठ शल्य आहे
भावपूर्ण श्रध्दांजली
अँड् विलास पाटणे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here