कोल्हापूर आणि सांगलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी

0

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथील व्यापाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली आहे. पुन्हा लॉकडाऊनसाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत प्रशासनाला निवेदनही दिले आहे. राज्य सरकारच्या पातळीवर लॉकडाऊनबाबत चाचपणी सुरु आहे. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होऊ शकतो. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा विचार व्यापाऱ्यांनी केला आहे. कडक लॉकडाऊनसाठी जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. व्यापारी, व्यावसायिक आजरा तालुक्यात उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन ठेवणार आहेत. तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गामूळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कडक लॉकडाऊन करणार असल्याबाबत प्रशासनाला निवेदनही दिले आहे. आजरा तालुक्यात आतापर्यंत 350 कोरोना रुग्ण तर 10 जणांचा कोरोनाबळी गेले आहेत. दरम्यान, कोल्हापुरात आतापर्यंत एकूण 23 हजार 103 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 699 जणांचा मृत्यू झालेला आहे. काल (30 ऑगस्ट) दिवसभरात एकूण 597 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत आतापर्यंत 11 हजार 203 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 399 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here