दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

0

रत्नागिरी : लांजा-पावस रस्त्यावरील चांदोर फाटा येथील वळणावर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वा. सुमारास घडली. या अपघातात सचिन रामचंद्र गुरव (२९) या तरुणाचा मृत्यू झाला असून रुपेश पांडुरंग गुरव (२८, दोन्ही, रा. गवाणे, लांजा) हा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी हे दोघे दुचाकी वरून पावस ते गवाणे असे जात होते. तेव्हा दुचाकीवरील ताबा सुट्रन हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पूर्णगड पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तेथील ग्रामस्थांनी दोघांनाही तातडीने सापुचेतळे ग्रामीण रुग्णालयात नेऊन अधिक उपचारासाठी साठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत असताना सचिनचा मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here