मासेबाव येथे हॉटेल मालकाला मारहाण; ४३ जणांविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : तालुक्यातील मासेबाव येथील हॉटेल मालकाला अज्ञात कारणातून मारहाण केल्याप्रकरणी ४३ जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना शनिवारी सकाळी ६.३० वा.समारास घडली. या प्रकरणी संतोष झोरे, संतोष कोकरे, जगदीश झोरे आणि इतर ४० जणांविरोधात (सर्व रा. रत्नागिरी) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दीपक यशवंत रामगडे (४२, रा. करबुडे, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी दीपक रामगडे मासेबाव येथील आपल्या हॉटेलमध्ये साफसफाई करण्यासाठी गेले होते.त्यावेळी संशयितांनी हॉटेलबाहेर बेकायदा जमाव करून हॉटेलचा पाठीमागील दरवाजा लाथा मारून तोडला. त्यानंतर संतोष झोरे, संतोष कोकरे, जगदीश झोरे या तिघांनी हॉटेलमध्ये जाऊन दीपक रामगडे यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी रामगडे यांना जबरदस्तीने क्वालिस गाडीत कोंबुन वेतोशी येथे नेले. तेव्हा रामगडे यांनी मी आत्महत्या करेन असे सांगितल्यावर संशयितांनी त्यांना पुन्हा हॉटेलजवळ नेऊन सोडले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:50 AM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here