एनसीसी कॅडेट्सना पोलीस भरतीत आरक्षण देण्याची आ. निकम यांची मागणी

0

रत्नागिरी : राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसी कॅडेट्सना पोलीस भरतीमध्ये आरक्षण मिळावे, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात बहुतांश महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर राष्ट्रीय छात्र सेना कॅडेटसचे शिक्षण दिले जाते. राष्ट्रीय छात्र सेनेचे शिक्षण पोलीस, आर्मी दलातील कर्मचाऱ्यांसारखेच असते. राष्ट्रीय छात्र सेनेचे शिक्षण घेत असतानाच हे विद्यार्थी देशाची किंवा राज्याची सेवा करण्याचे स्वप्न बघत असतात. मुलांच्या बरोबरीने मुलीसुद्धा या क्षेत्रात पाहावयास मिळतात. राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांच्या बाबतीत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १९ मार्च रोजी एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य पोलीस दलामध्ये कॅडेटस यांना आरक्षण मिळावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. आगामी काळात होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील सर्व राष्ट्रीय छात्र सेना प्रमाणपत्र धारकांना आरक्षण मिळण्यासंदर्भात संबंधितांना आदेश व्हावेत, अशी विनंती श्री. निकम यांनी आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here