करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

0

रत्नागिरी : पावसाच्या प्रमाणात झालेला बदल आणि जुन्या भाताच्या प्रजातींचे बियाणे वापरल्याने भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती राजापूरचे मंडल कृषी अधिकारी दादासाहेब झेंडे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे भातशेती चांगलीच तरारली आहे. त्यामुळे शेतकरी काहीसे सुखावले आहेत. त्याचवेळी भातशेतीवर राजापूर तालुक्यातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. करप्यामुळे भाताच्या रोपांची पाने तांबूस रंगाची झाल्याने बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन श्री. झेंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, भातशेतीवर सध्या बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जुन्या जातीच्या वा कालबाह्य भात बियाण्यांचा वापर केल्याने आणि पेरणीच्या वेळी बियाण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना वा बीजप्रक्रिया केली नाही, तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य अशा दोन प्रकारच्या करपा रोगांपैकी सद्यस्थितीमध्ये बुरशीजन्य करपा रोगाचा अधिक प्रादुर्भाव झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बुरशीजन्य करपा रोगामध्ये भाताची रोपाची पाने तांबूस रंगाची होतात, तर जिवाणूजन्य करपा रोगामध्ये भाताच्या रोपाच्या पानावर तांबूस रंगाचे ठिपके तयार होतात. आगामी क़ाळात पावसाचा जोर कायम राहिल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:04 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here