पुढल्या वर्षी लवकर याहो.. गणपती बाप्पा मोरया..

0

पुढल्या वर्षी लवकर याहो..
गणपती बाप्पा मोरया..
म्हणती बाळे गणेश देवा ..
असा पाहुणा सदैव यावा ..
भरल्या डोळा निरोप द्यावा ..
गणपती बाप्पा मोरया
🙏🙏

करोनाच्या ह्या महामारीत होत्याचं नव्हतं झालं.. अनेक आप्तजनांनी ह्या जगाचा निरोप घेतला…माणसामाणसांत अंतर पडलं…घरातील नाती दुभंगली…आजही आपण या महामारिचा सामना करत आहोत.. या परिस्थितीत सुद्धा सर्व धर्मीयांचे सण संयम बाळगून आपण साजरे केले ते देखील घरातूनच.याच काळात आला तो आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव… गणेशोत्सव …
गेली अनेक वर्ष रत्नागिरीच्या जनतेला हवाहवासा वाटणारा, त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारा आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा बाप्पा म्हणजे “श्री रत्नागिरीचा राजा”.दुर्दैवानं या महामारीत बाप्पाचा उत्सव आपण साजरा करू शकलो नाही याचं अतीव दुःख या मंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्या मनामध्ये ही आहे. मी आणि माझे सहकारी बाप्पाची यावर्षी सेवा करू शकलो नाही तसेच भाविकांना देखील राजाच्या दर्शनाला मुकावं लागलं ही खंत देखील आमच्या मनामध्ये नक्कीच आहे. परंतु नाईलाजाने आम्हाला गणेशोत्सवाची परंपरा या वर्षापुरती खंडित करावी लागली आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये ” राजाची “आठवण ही कायमस्वरूपी मनामध्ये ठेवून मी आणि माझे सहकारी वावरत आहोत.. राजाच्या आशीर्वादाने आम्ही आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. एवढेच नव्हे तर राजाच्या आशीर्वादाने मी कोव्हिड संकटातून सुखरूप बाहेर पडलो आहे. आजही आपल्या सर्वांच्या वतीने माझे राजाला एवढेच साकडे आहे की… हे विघ्नहर्ता! करोनाचे संकट दूर करून सर्वांना चांगले आयु-आरोग्य दे… सर्वांना सुखी ठेव.. .. मी आज श्री रत्नागिरीचा राजा मंडळाचा अध्यक्ष म्हणून निश्चय केला आहे की पुढच्या वर्षीचा तुझा उत्सव मोठ्या दिमाखदार पद्धतीने आम्ही सर्व मिळून साजरा करू. यावर्षीची उरलेली कसर पुढच्या वर्षी उत्साहाने भरून काढू. तुझी नेहमीसारखीच मनोभावे सेवा करू. इतके वर्ष अखंडितपणाने तुझी सेवा केली ती तू दिलेले आशीर्वादा मुळेच.हे सर्व आठवून आमच्या प्रत्येकाचे डोळे पाणावतात. ह्या वर्षी आम्ही तुझी स्थापना करू शकलो नाही ही खंत आमच्या मनात आयुष्यभर राहील. नाईलाजाने हतबल होऊन यावर्षी तुझी सेवा आम्ही करू शकलो नाही ह्या बद्दल आम्हाला क्षमा कर. तू विघ्नहर्ता आहेस आम्हाला समजून घेशील. आम्हा सर्व भक्तांन वरचे तुझे प्रेम तसूभरही कमी करणार नाहीस… आम्हाला पुढच्या वर्षी तुझं स्वागत मोठ्या जल्लोषात करायचे आहे म्हणून या महामारीला तू तुझ्या पायाखाली चिरडुन टाक. अखंड भारत देशाला..जगाला सुखी कर आणि पुढच्या वर्षी तुला आणण्याचा मार्ग मोकळा कर…
उदय सामंत
अध्यक्ष
श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सवमित्रमंडळ

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:35 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here