संगमेश्वर तालुका आरोग्य विभागाला लवकरच हक्काचे वाहन मिळणार

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुका आरोग्य विभागाला हक्काचे वाहन लवकरच देण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिली. संगमेश्वर तालुका आरोग्य विभागाला गेले तीन महिने हक्काचे वाहनच नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. ऐन कोरोनाकाळात वाहनाची कमतरता जाणवत आहे. देवरूखचे स्वॅब कलेक्शन सेंटर साडवली येथे आहे. तालुक्यात कोविड केअर सेंटरही आहे. मुख्य कार्यालयापासून हे दोन्ही लांब अंतरावर असल्याने कर्मचारी आणि साहित्य नेण्यासाठी स्वतःचे वाहन किंवा रिक्षाचा वापर करावा लागतो. यामुळे आर्थिक भुर्दंड तर बसतोच मात्र वेळेत काम होत नसल्याने याचा फटका सर्वांनाच बसत आहे. याबाबतीत वरिष्ठ स्तरावर चौकशी केल्यास वाहन मिळेल असे सांगण्यात येते. हा प्रकार गेले दोन महिने सुरू असल्याने आमदार शेखर निकम यांनी या गोष्टीत जातीने लक्ष घालून ही समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली. त्याची दखल श्री. निकम यांनी तातडीने घेतली. आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच जिल्हा स्तरावर तातडीने संपर्क करून तेथे वाहन उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 31-Aug-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here